'भारतमाता बहुउद्देशीय महिला मंडळ' या संस्थेच्यास माध्यमातून गेल्या मागील २० वर्षापासून समाजाच्या विविध स्तरांवर कार्यरत असतांना आदिवासी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार करणे त्यांना रोजगार मिळवून देणे. कारागृहात कैद्यांना ध्यान योग साधना प्रशिक्षण, पूरसद्दश्य नैसर्गिक आपत्तींच्या काळात लोकांना मदत करणे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, स्वःसंरक्षण प्रशिक्षण शिबिर चालविणे. विभागीय रस्ते, प्लॅटफॉर्म, पूल यांवर स्वच्छता मोहिम राबविणे या प्रकारची कामे वेळोवेळी करतो. हे करीत असताना आम्हाला असे आढळून आले की फुटपाथ, रेल्वे प्लॅटफॉर्म, बस स्टॅण्ड व झोपडपट्टी यावर राहणारी मुले आणि मुली यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. उदरनिर्वाहाचे योग्य साधन नाही. त्यामुळे ओढविलेल्या बिकट परिस्थितीमुळे नाईलाजाने त्यांना भिक्षा मागणे, कचरा वेचणे, हमाली करणे, चोरी पाकिट मारणे, नशा करणे हेच मिळकतीचे मार्ग बनत चाललेले आहेत.
या बालभवनात फुटपाथवर राहणाऱ्या परिवारातील रेल्वे स्टेशन व झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांच्या मुलांचे तसेच पालकच नसलेल्या दुर्लक्षित ( वंचित व निराधार) मुलांचे पुनर्वसन करण्या बरोबरच त्यांचे शारिरिक व शैक्षणिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये त्यांना रोजगार प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे. समाजात त्यांना स्वाभिमानाने व सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहा सोबत जगण्यास मदत करणे. हा, हे पूनर्वसन केंद्र वस्तीगृह स्थापन करण्याचा मुळ उद्देश आहे. तरी या समाज - हिताच्या कार्यात आपले सहकार्य मिळावे.मुलांची बौद्धिक क्षमता विकसित करणे गुन्ह्यांपासून दूर ठेवणे स्वावलंबन शुद्ध चारित्र्य व संस्कार.मुलांच्या मनात देशासाठी प्रेम तयार करणे.
एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला नकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात आणि या सकारात्मक विचारांमुळेच तर आपल्यात उत्साह निर्माण होतो. आणि व उत्साहाच्या वळावर आपण एखादे अशक्य वाटणारे कार्य सुद्धा पूर्ण करतो. जीवनात उत्साह जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही. तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो. कारण एका दृष्टिकोनातून पाहिजे असता माणसाचे जीवन हे अशा आकांक्षावर अवलंबून आहे जीवनात आशा अस खूप महत्वाचे आहे. कधीही हार न मानता समोर चालत राहणे म्हणजेच आयुष्य होय. त्यासाठी आपल्याला जीवनात कधी हताश, उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे. आणि जो या नियमांचं पालन करत आयुष्य जगतो त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो.